Friday, May 25, 2012

कसा होता संभाजी ?

कसा होता संभाजी ?
कसा होता संभाजी ? विचारताच प्रश्न,
येते उत्तर- होता ‘रगेल आणि रंगेल’,
कर्तुत्ववान शिवपुत्राचा इतिहास बाटवला गेला,
आणि आम्ही षंढासारखे पाहत राहिलो,
माफ करा शंभूराजे आम्हाला,
...आम्ही नालायक ठरलो,
साडे तीनशे वर्षे मनुवादी भूतांची गुलामगिरी,
सहन करत राहिलो,
नाही आवाज उठला आमचा,
नाही लिहिला सत्य इतिहास तुमचा,
पराक्रमी शिवपुत्र आपण,
चालली तलवार आणि लेखणीही,
भडकली माथी संस्कृतीच्या धर्माच्या ठेकेदारांची,
मक्तेदारी माडीत काढल्याचा राग,
एकजात सगळे पेटून उठले,
ज्या घरचे खाल्ले, त्या घरचेच वासे मोजले,
तीनदा विषप्रयोग आणि एकदा कैदेचे आडाखे,
महाराज, आपले नशीब बलवत्तर,
म्हणून अपयशी ठरले स्वराज्याचे खरे शत्रू,
शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे तेच,
आपल्या कैदेची स्वप्ने पाहणारेही तेच,
आपल्यावर विषप्रयोग करणारेही तेच,
आणि स्वराज्याच्या राख-रांगोळीसाठी प्रयत्न करणारेही तेच,
‘तेच’—कोण होते ते ?
नव्हते कोणी मुस्लीम, मराठे, बहुजन,
सारेच कसे काय ब्राम्हण ?
महाराज,
आज आमच्यावर आरोप केला जातो
ब्राम्हणांची निन्दानालस्ती केल्याचा,
आम्ही फक्त इतिहास सांगितला तरी निंदा नालस्ती,
आणि त्यांनी सर्व इतिहास बाटवला त्याचे काय ?
परंतु महाराज,
पुरोगामी महाराष्ट्रात असले प्रश्न विचारायचे नसतात,
नाही आम्हालाच अक्कल कारण,
आम्ही आपणाला निष्कलंक ठरवू पाहत होतो,
पण कसे बघवेल या धर्ममार्तंडाना,
विकाऊ जेम्स लेन द्वारे घेतला संशय जिजाऊंच्या चारित्र्यावर,
महाराज, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याला स्वताच्या आईची विटंबना झाल्याचे दुःख झाले,
वेडात दौडले वीर मराठे बहात्तर,
आणि एकाच कल्लोळ उठला,
अतिरेकी, दहशतवादी आणि शेलक्या शिव्या,
पुरोगामी-प्रतिगामी-समाजवाद
ी-गांधीवादी-कम्युनिस्ट सारे एक झाले,
जातीवर शेकले तर कशी तारांबळ उडते ते साऱ्या महाराष्ट्राने पाहिले
पण महाराज, आता काळजी नको,
आता घराघरात एकतरी विद्रोही ‘मराठा’ जन्मतोय,
करतोय चिकित्सा आणि स्वीकारतोय सत्य,
जेव्हा सनातनी विचारसरणी पुसून टाकण्यात होवू यशस्वी,
तेव्हाच महाराष्ट्र खऱ्या अर्थाने होईल धन्य.

Thursday, May 24, 2012

मावळ्यांची विटंबना अवमान थांबवा ...

मावळ्यांची विटंबना अवमान थांबवा ...
पुणे मुंबई सातारा कोल्हापूर
इत्यादी ठिकाणी सध्या एक मोठी लाट
आली आहे..
ती म्हणजे शिवकालीन वेशभूषेतील
मावळ्यांना लग्नात वेटर चे काम करवण्याची ......
सध्या काही लग्न शिवकालीन वातावरणात
लागत आहेत.
पण मंडपात मात्र लग्नातील वेटर हे
मावळ्याचा पोशाख घालून
... पाहुणेमंडळी यांना चहा पाणी कोल्ड्रिंक्स
इत्यादी वेटर सारखे काम करत असतात......
मावळ्यांना वेटर बनवणारे लोक
माझ्या दृष्टीने नालायक आणि हरामखोर
आहेत........
अरे
शिवरायांनी आपल्या मावळ्यांना तळहाताच्या फोडा प्रमाणे
जपले आणि आज शिवरायांचे नाव घेणारे लोक
मावळ्यांना वेटर बनवून
आपल्या श्रीमंती चा माज दाखवत आहेत....
वेटरला मावळ्याची वेशभूषा नसावी.....
याने शिवरायांचा आणि तमाम मावळ्यांचा अवमान
होतो....
असा अवमान या पुढे कोणाकडूनहि घडू
नये..
जय जिजाऊ
जय शिवराय