Sunday, February 19, 2012

शिवाजी महाराजांची तलवार



शिवाजी महाराजांची तलवार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ८ प्रमुख तलवारी होत्या,त्यातील सर्वात महत्वाची तलवार फिरंगी किवा भवानी तलवार जी सध्या रोयाल ब्रिटीश संघ्रलाय इंग्लंड मध्ये आहे.
शिवाजी महाराजांनी फिरंगी तलवार उर्फ भवानी तलवार portuguese ...व्यापार्यांकडून विकत घेतली होती.असा म्हंटल्या जाते नंतर शिवरायांनी भवानी मातेसमोर त्या तलवारीची प्रतीस्तापणा केली आणि त्या ताल्वारीमध्ये तोडासा बदल करून तिचे नाव भवानी तलवार ठेवले.
फिरंगी तलवार उर्फ भवानी तलवार ३५ ते ३८ इंची लामब असते ,फिरंगी तलवारला single sided किवा double sided धार असते.व तलवारीची मुठ स्टील ची असते.शिवरायांनी फिरंगी तलवार मध्ये काही बद्दल देखील केले,ते म्हणजे तलवारीच्या मुठीमध्ये कापुसाची गाधी भरली जेणेकरून ती सैनिकांना घाम आल्यावर तलवार हातातून निसटणार नाही.
काही दैववाद करणाऱ्या इतिहासकारांनी असे सांगितले आहे कि शिवरायांना भवानी तलवार स्वयं भवानी मातेने प्रगट होऊन दिले आहे.
जर भवानी मातेने शिवाजी महाराजांना भवानी तलवार दिली तर मग त्याच प्रकारची तलवार शाहजहान ह्या मुस्लीम शासकाकडे व बाजीराव पेशव्याकडे कोठून आली,शाहजहान आणि बाजीराव पेशव्याला पण भवानी माता प्रसन्ना झाली होती का?
सध्या फ्रेंच इतिहासकार फ्रान्सीस gouitier ह्या फ्रेंच इतिहासकाराने भवानी माता शिवरायांना तलवार देतांनाचा पुतळा बनवला आहे,अश्या स्वरूपाचे पुतळे उभारून आपण जिजामाता व शिवरायांचे कर्तुत्व नाकारत आहोत का?
ज्या शिवरायांनी मंगठीच्या झोरावर स्वराज्य निर्माण केले त्याला दैव वादाचे रूप देणे योग्य आहे का?शिवरायांना देवी प्रसन्ना झाली म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले असा प्रचार करणे योग्य आहे का?
ज्या प्रकारे राम आणि कृष्ण ह्यांना विष्णूचा अवतार घोषित करून त्यांचा वापर दान आणि दक्षिणा मिळवण्यासाठी भटांनी केला तसाच प्रकारे मराठा साम्राज्याचा बाबतीत भाकड कथा रचणे योग्य का?छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेने स्वतः प्रगट होऊन तलवार दिली होती आणि त्याच तलवारीला भवानी तलवार म्हणतात असा अपप्रचार देशभरात करण्यात आलेला आहे.काही इतिहास्कारांनीच असा अपप्रचार केलेला आहे.छ.शिवाजी महाराजांचे कर्तुत्व लोकांपर्यंत पोहोचूनही अशा या अपप्रचाराने कर्तुत्वप्रधान महाराष्ट्रिय समाज दैववादी बनून बसला आणि महाराजांना भवानी मातेचा आशीर्वाद होता म्हणूनच ते इतके पराक्रम करू शकले आणि संकटातून नेहमी वाचत राहिले असाच विचार समाजमनात पेरला गेला.चांगल्या नशिबाशिवाय काहीच करता येत नाही असे लोक समजू लागले.या इतिहासकारांनी असा प्रचार का केला हे त्यांनाच माहित असेल.त्यांनी असे चुकून केले असे समजायला आपण काही मूर्ख नाही कारण सावंतवाडी जवळील कुडाळ नावाच्या गावातून एका पोर्तुगीज व्यापाऱ्याकडून ३०० होण (१०५० रुपये) रोख देऊन ही तलवार विकत घेतल्याची नोंद महाराजांनी त्यांच्या दफ्तरात(accounts मध्ये) करून ठेवलेली आहे.महाराज केलेला प्रत्येक खर्च दफ्तरात लिहित असत कारण हिशोबात पक्के असण्याचा महाराजांचा कटाक्ष होता.५ मार्च १६५९ ला ही तलवार विकत घेतल्याचे येथे नमूद केले आहे.असे असूनही या इतिहासकारांनी असल्या प्रकारचा अपप्रचार का केला असावा हे समजण्याइतके आपण सर्व सुध्न्य आहात.पुन्हा जर कुणी छ.शिवरायांच्या तलवारीच्या बाबतीत असा अपप्रचार केला तर आपण कुणीही या भूलथापांना बळी पडू नये.आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेऊन पुढील जीवन जगण्याचा मनोनिग्रह करूया.
..................छ.शिवाजी महाराज की जय.............

कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज